कालच एक पुस्तक वाचल. स्वामी विवेकानंदांच चरित्र होत ते. उत्तम शब्दरचना आणि उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलेलं होत. स्वामी विवेकानंद हे व्याक्तीमत्वच अस आहे कि ज्याचा प्रभाव मनावर उमटल्याशिवाय राहत नाहि. आजच्या ब्लॉगचा विषय हा स्वामींच चरित्र नाही आहे पण त्यांच्या चारीत्रामधील एक महान विचार वाचला त्यावर सखोल विचार चालू झाला .त्यांनी अनेक वेळा म्हटले आहे कि प्रत्येक मानवामध्ये एक देव आहे. अगदी बरोबर पण देवाबरोबर प्रत्येक माणसामध्ये एक अतिरेकी वास करतोय आणि हा अतिरेकी त्या देवावर वरचढ ठरतोय. हा अतिरेक्याने आज माणसाला गुलाम बनवून टाकलाय. वाढते बलत्कार , भृणहत्या , स्त्री दुर्बलीकरण, जात, पंचायत ह्या सर्व गोष्टी ह्या त्या अतिरेकाचीच पैदास आहे.
आजचा मुद्दा हा धार्मिक अतिरका बद्दल आहे , हा विषय ज्यावेळी निघतो तेवा एका ठराविक समाजाला लक्ष्य केल जात. पण ह्याची एक दुसरी बाजू आहे त्यामुळे आपण सर्व आरोपीच्या पिंजर्यात उभे रहतो.
मी हिंदू आहे ,मला त्याचा अभिमान आहे आणि हा अभिमान हा इस्लाम च्या द्वेषातून आलेला असेल तर त्याला अभिमान म्हणणार का?
मी मुसलमान आहे मला त्याचा अभिमान आहे आणि हा अभिमान आहे हा हिंदूत्वचा द्वेषातून आलेला असेल तर त्याला अभिमान म्हणणार का?
गेले अनेक वर्ष आपला देश धार्मिक दंग्यांनी त्रस्त आहे , जागत सर्वात जास्त बळी हे धार्मिक दंग्यांनी घेतले आहेत .
ह्याच कारण हा कोणता धर्म नसून आपल्या मनात दडलेला तो अतिरेकी आहे . वेद कुरान बायबल ह्याच्यातील शब्दांचा श्लोकांचा मनला वाटेल तसा अर्थ लावून धार्मिक भावना भडकावायाच्या आणि माणुसकीचा गळा घोटायाचा. जबाबदार कोण तर समोरची मानस.
स्वामी विवेकानंदानी सांगितलेला धर्म आणि आपण पळत असलेला धर्म जमीन आसमानाचा फरक आहे.
एका साधा विचार आहे जगात माझ्या समोर एक दुसरा धर्म आहे म्हणुन मला माझ्या धर्माचा अभिमान आहे .
तो धर्मच नसता तर कसला अभिमान आणि कसली धर्मिकता . द्वेषातून आलेलाला अभिमान हा फक्त द्वेषाच विष पसरवतो आणि अतिधार्मिकता हि फक्त अतिरेक्याला जन्म देते. समर्थांचे मनाचे श्लोक लहान असल्यापासून वाचेले पाठांतर केले पण त्याचा अर्थ आपल्या ध्यानी कधी आलाच नाही . कोणतीही वाईट कल्पना हि पहिली मनात घडते आणि मग कृतीत येते. मग ती साधी मारामारी असू देत किवा कोणताही मोठ हत्याकांड ते पहिल्यांदा घडत मनात. समर्थांनी सांगितलाय कि मनाचे गुलाम होऊ नका आणि आज आम्ही त्याचेच गुलाम झालो अहोत. आज एकविसाव्या शतकात सुध्दा लगानच्या वेळी नवरीला किवा नवर्याला त्याची जात विचारता. धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाहीं. जर असेच दंगे होत राहिले तर एक दिवस माणूसच राहणार नाही तीच धर्माची सगळ्यात मोठी हार असेल.
आपण महान माणसांबद्दल बोलतो , तो माझ्या जाती धर्मात जन्माला आला ह्याचा अभिमान बाळगतो, त्यांच्या नावाने आपल्या मुलामुलीची नाव ठेवतो , त्यांच्या जयंत्या पुण्यातीथ्या मोठ्या उत्साहात साजर्या करतो, पण …………… पण त्यांचं चरित्र आपण आत्मसात करीत नाही , त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कधीच चालत नाही आणि हीच आपल्या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
धर्मासाठी माणसाने माणसाला इतके कापले कि,
रक्त आणि पाण्यामधला फरकच कळेनासा झालाय
काश्मीरच्या स्वर्गात पूर्वी हिमनग होते,
आता त्यांचा रक्ताने माखलेला वाळवंट झालाय .
............................................................................................………………………. प्रविण मारुती भिकले

No comments:
Post a Comment